Saturday, June 13, 2026
Home Breaking News ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात हमालाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी.

ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात हमालाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी.

0
27

ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात हमालाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी.

एस.के.टीव्ही न्युज 
चामोर्शी : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथून हार्डवेअरचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना ५ जून रोजी सायंकाळी 6:30.च्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील भेंडाळाजवळ घडली.या अपघातात एका हमालाचा जागीच मृत्यू झाला असून, चालक आणि आणखी एक हमाल जखमी झाले आहेत.
मयत विलास भाऊजी भोयर वय,45 वर्ष रा. लखमापूर बोरी) हे ट्रॅक्टर मधून हार्डवेअरचे साहित्य लखमापूर बोरी येथे घेऊन जात होते. भेंडाळाजवळ पोहोचताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर (MH.33 F – 364) उलटला.या अपघातात विलास भोयर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातात ट्रॅक्टर चालक कृष्णा देवाजी भोयर आणि हमाल बाबूराव सोमा भोयर हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाबाबत मनोज बाहेती यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक कृष्णा भोयर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार श्यामला पौळ हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!