Home Social News ओबीसी जातीचे शासन राजपत्र नाही तो पर्यंत जनगणनेला असहकार ओबीसींचा वाढता असंतोष.
ओबीसी जातीचे शासन राजपत्र नाही तो पर्यंत जनगणनेला असहकार ओबीसींचा वाढता असंतोष.
एस.के.टीव्ही न्युज
ब्रह्मपुरी – १०/०६/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) जनगणना २०२६ च्या पहिल्या टप्प्यात घरगणनेच्या रकान्यामध्ये ओबीसी जातीचा स्वतंत्र रकाना नसल्यामुळे राज्यातील बहुतेक शहरात खेडोपाडी ओबीसी संघटना आक्रमक होऊन ओबीसी समाजाने सुरू असलेल्या घरगणना,जनगणनेवर माहिती गोळा करणाऱ्या प्रगणकाला वैयक्तिक माहिती देण्यास स्पष्ट नकार देत आहेत.
त्यामुळे येत्या १५ जून पर्यंत मुदत असणाऱ्या जनगणनेचा पहिला टप्पा घरगणना पूर्ण होते की काय अशी शंका निर्माण होत आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील ओबीसी संघटनेने सुरू असलेल्या घरगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसी जातीचा स्वतंत्र रकाना नसल्यामुळे बहिष्कार टाकला आहे.
ब्रह्मपुरीचे तहसीलदार सतीश मासाळ यांनी अ-हेरनवरगाव येथील ओबीसी संघटनेचे पदाधिकारी व नागरिक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत संघटना पदाधिकारी कार्तिक वैद्य, साहिल पिलारे, चेतन चिचमलकार,मंगेश जराते, ईश्वर कुथे, विलास उरकुडे यांनी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या ओबीसीचा जनगणनेवर बहिष्कार हे ताजे उदाहरण,
जात धरून जणगणना परंतु प्रवर्ग नाही, कलम ३४० चा अर्थ, घरी येणाऱ्या जनगणना अधिकारी यांनी योग्य पद्धतीने कुटुंब प्रमुखाला माहिती समजावुन सांगितल्यास मनात गैरसमज होणार नाही.
दुसऱ्या टप्प्यातील जनगणनेत विस्तारित प्रवर्गात जात असा उल्लेख राहील का ? आणि फेब्रुवारी २७ महिन्यापासून होणाऱ्या जात निहाय जनगणनेत ओबीसी जातीचा स्वतंत्र रकाना राहील या विषयीची लेखी हमी देण्यासंबंधी व इतर शंकांविषयी चर्चा करण्यात आली.
तहसीलदार सतीश मासाळ यांनी संविधानाच्या चौकटीत व शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गावकरी व ओबीसी संघटना पदाधिका-यांच्या शंकेचे निराकरण करून घरी येणाऱ्या जनगणना प्रगनकाला कुटुंबाची माहिती देऊन शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार मासाळ यांनी केलेल्या शंकेच्या निराकरणामुळे योग्य समाधान न झाल्यामुळे , जोपर्यंत शासन ओबीसी जातीचा राजपत्र काढत नाही तोपर्यंत जनगणनेला असहकार राहील अशी स्पष्ट भूमिका ओबीसी संघटना पदाधिकारी व नागरिक अ-हेर नवरगाव यांनी घेतली आहे.
error: Content is protected !!