Home Breaking News डॉ.सचिन बी.कुलसंगे यांच्याकडून अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई करण्याबाबत पोलिस...
डॉ.सचिन बी.कुलसंगे यांच्याकडून अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई करण्याबाबत पोलिस निरीक्षकांना निवेदन..!
एस.के.टीव्ही न्युज
चामोर्शी : शहरातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई व जलद तपास करण्याबाबत डॉ.सचिन बी. कुलसंगे (जिल्हाध्यक्ष) राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी,सामाजिक न्याय फाउंडेशन, जिल्हा शाखा,गडचिरोली यांच्या कडून पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, चामोर्शी ता.चामोर्शी, जि.गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार
चामोर्शी शहरातील एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अत्यंत गंभीर, निंदनीय व मानवतेला काळिमा फासणारी आहे. सदर प्रकरणातील पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी नुकतेच एक नवे घर बांधले असून, सध्या त्याच्या स्लॅबवर रंगकामाचे काम सुरू आहे.नेहमीप्रमाणे ही सात वर्षीय चिमुरडी घराच्या गच्चीवर खेळत होती. यावेळी तिथे रंगकाम करत असलेल्या प्रज्वल ऊर्फ नारू सदाशिव भांडेकर याने आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधली. त्याने चिमुरडीला एकांतात गाठून तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर पीडित बालिकेला शारीरिक त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांच्या हे लक्षात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांद्वारे समजले.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून प्रज्वल ऊर्फ नारू सदाशिव भांडेकर वय २५ वर्ष या आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील तसेच पॉक्सो कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पीडित बालिकेला व तिच्या कुटुंबाला आवश्यक संरक्षण, समुपदेशन व शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी.
सदर प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषी व्यक्तीस कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
error: Content is protected !!