Home Chandrapur ब्रम्हपुरी – आरमोरी मार्गावर निलगिरी बार समोर गिट्टीने भरलेला हायवा नाल्यात कोसळला,चालक...
ब्रम्हपुरी – आरमोरी मार्गावर निलगिरी बार समोर गिट्टीने भरलेला हायवा नाल्यात कोसळला,चालक व क्लिनरचा जागीच मृत्यू.
एस.के.टीव्ही न्युज
ब्रम्हपुरी : दि,११/०६/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) ब्रह्मपुरी पासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मपुरी – आरमोरी मार्गावर असलेल्या पारडगांव जवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला.
रोड लगत असलेल्या निलगिरी बारसमोरील नाल्यात गिट्टीने ओव्हरलोड भरलेला हायवा ट्रक कोसळल्याने चालक आणि क्लिनरचा जागीच करुण अंत झाला.हा अपघात इतका भयानक होता की हायवाच्या केबिनची खूप मोडतोड झाली.प्राथमिक अंदाजानुसार, हा अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला.
एम.एच – ४० सीडी ९००२ क्रमांकाचा हायवा ट्रक गिट्टी भरून जात असताना, चालकाला अचानक झोपेची डुलकी आली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव हायवा रस्ता सोडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात कोसळला.हायवामध्ये गिट्टी प्रमाणाच्या बाहेर असल्याने हा भीषण अपघात घडला.
या भीषण दुर्घटनेत दोघांचा चालक व वाहक यांचा ट्रक मध्ये फसून राहिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. यात चालक सुरेश आनंदराव भुरले (वय ३३ वर्षे, रा. मांढळ ता. लाखांदूर जि.भंडारा) व वाहक अमित देवराव कुमरे (वय २९ वर्षे रा. इरवा ता.चिमूर.जि.चंद्रपूर) यांचा समावेश आहे. अपघातामुळे हायवाच्या समोरील केबिन पूर्णपणे चेपली गेली होती. त्यामुळे दोन्ही मृतदेह आतमध्येच अडकून पडले.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, केबिनची झालेली दुर्दशा पाहून आत मध्ये दाबून असलेले मृतदेह बाहेर काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हानात्मक काम होते.अखेर स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह केबिन कापून बाहेर काढण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले आहेत. नाल्यात पडलेला अपघातग्रस्त हायवा बाहेर काढण्याचे काम सुरू असून ब्रम्हपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या भीषण अपघातामुळे पारडगाव आणि परिसरामध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून ऐन उमेदीच्या वयात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मूळ गावी आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
error: Content is protected !!