Home Social News वार्ड नंबर 01 मधील पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी तहसीलदार सतीश मासाळ यांना...
वार्ड नंबर 01 मधील पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी तहसीलदार सतीश मासाळ यांना निवेदन.
एस.के.टीव्ही न्युज
ब्रह्मपुरी – १०/०६/२६ (अमरदीप लोखंडे,सहसंपादक) अ-हेरनवरगांव येथील ३,३८,४२,३४९ /- रुपयाची प्रत्येक घरी नळ योजनेद्वारा मिळणारा पाणी ही जलजीवन मिशन योजना फसवी निघाल्यामुळे येथील जनतेला ऐन उन्हाळ्यात नळाद्वारे पुरेसा पाणी मिळत नाही.
येथील वार्ड नंबर 01 मध्ये शासकीय दोन बोअर असून त्या नादुरुस्त असल्यामुळे वॉर्डातील नागरिकांना नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा पुरेसा होत नाही याची वारंवार तोंडी व लेखी सूचना जवळपास तीन चार वेळा ग्रामपंचायतला रीतसर तक्रार करूनही ग्रामपंचायतीने तोंडी सूचना व लेखी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.
ब्रह्मपुरी चे तहसीलदार ओबीसी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी गावात येत आहेत याची वॉर्डातील स्त्रियांना भनक लागल्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या रिकामे घगरे घेऊन एकत्र येऊन तहसीलदार सतीश मासाळ यांना वार्ड नंबर एक मधील जाणवत असलेल्या पाणी टंचाई संबंधीचे नयना क-हाडे, बिंदिया बोरकर, रत्नमाला खोब्रागडे व इतर वार्डातील महिलांनी निवेदन दिले.
निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार सतीश मासाळ यांनी सर्वंग विकास अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
error: Content is protected !!