Saturday, June 13, 2026
Home Chandrapur घुग्घुस येथील इंदिरानगर भागातील पाच तरुण वर्धा नदीत बुडून मृत्यू.

घुग्घुस येथील इंदिरानगर भागातील पाच तरुण वर्धा नदीत बुडून मृत्यू.

0
24

घुग्घुस येथील इंदिरानगर भागातील पाच तरुण वर्धा नदीत बुडून मृत्यू.

एस.के.टीव्ही न्युज 

घुग्घुस : घुग्घुस येथील इंदिरानगर भागातील पाच तरुण मित्र सोमवारी (दि.8 जून) दुपारी सुमारे 1:00. वा.जवळील म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले होते.या पाचही जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला.मंगळवारी सकाळी बोटीद्वारे शोध मोहीम राबवली असता दोघांचे मृतदेह गवसले.तिघांचा शोध सुरू आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

नकुल केळझळकर वय,१८ वर्ष,सन्नी आसमपेल्ली वय,१८ वर्ष,सम्यक सोनटक्के वय,१७ वर्ष,तन्मय पाथाडे वय,१७ वर्ष, रोहित बोबडे वय,१९ वर्ष

हे पाच मित्र दुपारच्या सुमारास म्हातारदेवीजवळील वर्धा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.सायंकाळपर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.केवळ रिंग जात होती पण मोबाईल रिसिव्ह होत नव्हता.

काही वेळाने मोबाईलची बॅटरी उतरल्याने तेही लागत नव्हते.मग शोधाशोध सुरू झाली.हे पाचही मित्र नदी कडे गेल्याची माहिती मिळाली.यानंतर नदी काठावर शोध सुरू झाला.म्हातारदेवी परिसरात असलेल्या वर्धा नदीच्या चांदुर घाटावर या पाच मुलांचे कपडे,मोबाईल व अन्य साहित्य आढळून आले.

यावरून हे मित्र पोहायला आले आणि डोहात बुडल्याचा संशय बळावला.घुग्घुस पोलिसात पालकांनी मुले बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी शोध घेतला पण रात्र असल्याने काहीही हाती लागले नाही.

मंगळवारी सकाळी बोटीच्या माध्यमातून नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली असता काहीच वेळात 2 ते 3 तासांच्या फरकाने दोघांचे मृतदेह सापडले.घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!