Saturday, June 13, 2026
Home Maharashtra स्ट्रेचर न मिळाल्याने आदिवासी महिलेवर आजारी नवऱ्याला पाठीवर घेत बायकोची भटकंती. 📍रुग्णालय...

स्ट्रेचर न मिळाल्याने आदिवासी महिलेवर आजारी नवऱ्याला पाठीवर घेत बायकोची भटकंती. 📍रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा,कर्मचाऱ्यांची क्रूर असंवेदनशीलता.

0
34

स्ट्रेचर न मिळाल्याने आदिवासी महिलेवर आजारी नवऱ्याला पाठीवर घेत बायकोची भटकंती.

📍रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा,कर्मचाऱ्यांची क्रूर असंवेदनशीलता.

एस.के.टिव्ही न्युज

अकोला : अकोला येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (जीएमसी) रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या रुग्णवाहिकांची कमतरता असल्यानं रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. नुकत्याच एका आदिवासी महिलेनं आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात भटकंती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या महिलेनं आपल्या पतीला उपचारासाठी जीएमसीत आणलं होतं.

तिचा पती खूप आजारी असुन त्याला चालताही येत नव्हतं. महिला आपल्या पतीला रुग्णालयात घेऊन आली, परंतु तिला रुग्णालयाच्या परिसरात रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे ती आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात उपचारासाठी भटकत राहिली. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात फिरताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर रुग्णालयाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

रुग्णालयात रुग्णवाहिकांची कमतरता, सुरक्षारक्षक व मदतीनीस असताना सुद्धा असे प्रकार घडत आहेत. यावर जीएमसी प्रशासन या घटनेवर काय कारवाई करते? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण झाला आहे. ही घटना जीएमसीच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं प्रतीक आहे.रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. जर रुग्णांना योग्य उपचार मिळाले नाहीत, तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

शासन आणि प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेऊन रुग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असं नातेवाईकांनी म्हटलं आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये ब्रेन स्ट्रोक आलेल्या पतीला उपचारासाठी घेऊन एक महिला अकोला मेडिकल कॉलेजमध्ये आली होती.

ती महिला स्ट्रेचर, व्हीलचेअर अभावी पतीला अक्षरशः पाठीवर घेऊन रुग्णालयाच्या विविध विभागांत भटकताना दिसते. ही महिला एका हाताने लहान मुलाला सांभाळत होती, पोटाला बॅग लटकवलेली होती आणि दुसऱ्या बाजूला गंभीर अवस्थेतील पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करत होती.

धक्कादायक बाब म्हणजे, त्याठिकाणी सुरक्षारक्षक आणि वॉर्डातील कर्मचारी उपस्थित होते. ते हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यानं पाहत होते. मात्र, महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. यामधूनच अकोला मेडिकल कॉलेज प्रशासनाची असंवेदनशीलता उघड होत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कदाचित शासनापर्यंत सुद्धा पोहोचला असेल,

शासन या व्हिडिओला किती गंभीरतेनं घेतं आणि संबंधितांवर कारवाई करतं की शासनही मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्याप्रमाणे असंवेदनशीलता दाखवतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!