Home Gate Way OF india आमदार रवी राणांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन

आमदार रवी राणांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन

0
78

मुंबई प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या मुंबईवरील वादग्रस्त विधानाचे आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे, अशी प्रतिक्रिया राणा यांनी दिली आहे. तसेच त्यांनी मुंबईबद्दल जे व्यक्तव्य केलं आहे. ते भौगोलिक दृष्ट्या केले असावे, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते भौगोलिक दृष्ट्या केलं असेल. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. मुंबई हे देशातील सर्वात हायटेक शहर आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईची सुरूवात गिरणी कामगारांपासून झाली होती. मात्र, त्यानंतर तिथे अनेक व्यापारी आणि जाती-धर्माचे लोक आलेत. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यात सर्वांचा हातभार आहे. मुंबई ही सर्वांची आहे, अशी प्रतिक्रिया राणा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here