Home Top News धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
102

 

शिवसेना आणि शिंदे गटात धनुष्यबाणावरून सुरु असलेल्या लढाईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. फडणवीस यांनी धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच असल्याचे संकेत दिले. दोंडाई येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांना गदा आणि धनुष्यबाणाची भेट देऊन स्वागत केलं. यावेळेस सांकेतिक भाषेत त्यांनी धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे सोबतच राहणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी त्यांना देण्यात आलेल्या चांदीचा गदेचाही मार्मिक उल्लेख करत, आता या चांदीच्या गदेद्वारेच सत्ता बदला झाला असल्याचं फडणवीस यांनी म्हणाले. तसेच आता महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, कुठेही हनुमान चालीसा म्हणता येईल, असं सांगत फडणवीस यांनी प्रखर हिंदुत्वाला महाराष्ट्रात यापुढे प्राधान्य राहील असे संकेतही त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here