Home G-Global कितीही बाण पळवा,धनुष्य माझ्याकडेच – उद्धव ठाकरे

कितीही बाण पळवा,धनुष्य माझ्याकडेच – उद्धव ठाकरे

0
76

प्रारंभ वृत्तसेवा

मुंबई : भाजपला शिवसेना संपवायची असल्याने ते कोंबडय़ांची झुंज लावावी तसे शिवसेना आणि त्यातून फुटणाऱ्यांची झुंज लावत आहेत. झुंजीत एक कोंबडा मेला की दुसऱ्याला मारून टाकतील अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे, असा इशारा ठाकरे यांनी भाजप-शिंदे गटाला दिला.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्याचबरोबर सायंकाळी जिल्हा प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांसह पुन्हा ऑनलाइन बैठक घेतली. कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे पदाधिकारी तुमच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here