Home Top News गोपत पिंपळगाव आणि टाकळगव्हाणचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

गोपत पिंपळगाव आणि टाकळगव्हाणचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

0
70

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत केला जाहिर प्रवेश

गेवराई  प्रतिनिधी :  ग्रामपंचायत निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत यशानंतर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चैतन्य संचारले असून माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करत भाजपा-सेनेचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. मौजे गोपत पिंपळगाव आणि टाकळगव्हाण येथील शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गोपत पिंपळगाव येथील भाजपा-सेनेचे सक्रिय कार्यकर्ते उद्धवराव तौर, गणेश तौर, संभाजी तौर, पद्माकर तौर, अर्जुन तौर, निवृत्ती माने, रोहिदास माने, सखाराम माने आदींनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. सदस्य अण्णासाहेब तौर, शंकर तौर, अनिरुद्र तौर, शैलेश तौर, विलास मस्के, उदयसिंह मस्के, देविदास तौर, दिगंबर खरात, भारत वैराळ, विष्णुपंत अरदड, आसाराम चोपडे, भगवान काकडे, भागवत काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकळगव्हाण येथील भाजपाचे राजेंद्र करपे पाटील, भाऊसाहेब करपे पाटील, दादासाहेब करपे पाटील, पदमसिंह करपे पाटील, बाबू करपे पाटील आदींनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी विठ्ठलराव शेळके, पांडुरंग कोळेकर, बापू रसाळ, सरपंच बाळासाहेब साठे, सुरेश मरकड, सोमेश्वर गचांडे, बाळू मरकड, राम नवले, सुरेशकाका पवळ, डॉ.रमाकांत कुंभार, विकास सानप, अतुल शेरकर, रावसाहेब शेरकर, बंडू पाटील करपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जसे हातात हात घालून काम केले तसेच येणाऱ्या काळातही राष्ट्रवादी काँग्रसच्या झेंडा जि.प. आणि पं.स‌. निवडणूकीत फडकवण्यासाठी आतापासूनच कामाला सुरुवात करावी असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here