Home Top News बीड जिल्हातुन आ विक्रम काळे यांना निर्णय आघाडी मिळणार- आ संदीप क्षीरसागर

बीड जिल्हातुन आ विक्रम काळे यांना निर्णय आघाडी मिळणार- आ संदीप क्षीरसागर

0
70

बीड -औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ विक्रम काळे यांच्या पाठीशी मागील चार निवडणुकीत जिल्ह्यातील शिक्षक पदवीधर खंबीरपणे उभा राहिला असून बीड जिल्ह्यातून आमदार विक्रम काळे यांना निर्णय आघाडी मिळणार असुन विजयाचा चौकारच नव्हे तर ते षटकार लावणार आहेत असे विश्वास आ संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून गेल्या अठरा वर्षांपासून आ विक्रम काळे हे सेवा करीत असून शिक्षकांच्या पदवीधरांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक हितकारिक निर्णय त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात घेतले असून याचा फायदा अनेकांना झाला आहे. बीड जिल्ह्यातील मतदार हा विक्रम काळे यांच्या पाठीमागे असून भविष्यात विक्रम काळे विजयाचा चौकारच नव्हे तर षटकार लावून शिक्षक पदवीधर विद्यार्थ्यांचे सेवा करणार याबाबत दुमत नसून शिक्षकांचे अनेक प्रश्नांचे निराकरण आमदार विक्रम काळे यांनी केले असून मराठवाड्यातील मतदार परत एकदा त्यांना विधान परिषदेवर आपल्या हक्काचा आमदार म्हणून पाठविणार असून बीड आमदार विक्रम काळे यांना निर्णायक आघाडी मिळणार असा विश्वास राष्ट्रवादी भवन येथे आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थित आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या नंतर पत्रकारांशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार विक्रम काळे यांच्यासह माजी आमदार सय्यद सलीम ,राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या प्रा सुशीलाताई मोराळे, काँग्रेसचे नेते रवींद्र दळवी, भाई मोहन गुंड डॉ नरेंद्र काळे दीपक घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here