Home Top News नात्याला काळीमा फासणारी घटना; बापाने व चुलत्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नात्याला काळीमा फासणारी घटना; बापाने व चुलत्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
71

तर आजोबांकडून विनयभंग;पुण्यातील घटनेने उडाली खळबळ; बापास अटक तर इतरांचा शोध सुरु

प्रारंभ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील एका 17 वर्षीय तरुणीवर वडील आणि चुलत्याने बलात्कार केल्याची घटना उघड झाली असून आजोबाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सुद्धा समोर आला आहे. पिडीतेच्या तक्रारीवरुन तिघांवर विश्रांतीवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दिवसेंदिवस घडणाऱ्या घटना नात्याला काळीमा फासणाऱ्या घडत आहेत. एवढी निच वृत्ती निर्माण तरी कशी होते. पुणे येथील एका 17 वर्षीय तरुणीवर तिच्याच घरात बलात्कार होतो व हा बलात्कार तिचेच वडील, चुलता करतो हे अत्यंत लाजीरवाणे आहे. वडील अजय (वय-49) चुलता विजय (वय-33) यांच्यावर बलात्काराचा तर आजोबा रामेश्‍वर (वय -70) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित तरुणी तिच्या मूळ गावी 2016 ते 2018 दरम्यान गेली होती. त्यावेळी तिच्यावर चुलता विजयने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले तर आजोबा रामेश्‍वरने तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती पीडित तरुणी पुण्यात कुटुंबियांसोबत राहण्यास आली तर वडील अजयने देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला.
कुटुंबातील व्यक्तीकडून तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांमुळे ती शांत राहायची. त्याच दरम्यान तिच्या महाविद्यालयात समुपदेशनचा कार्यक्रम होता. त्यावेळी तिने तेथील व्यक्तीला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आल्यावर,वडील, चुलता यांच्यावर बलात्कार आणि आजोबा यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यातील आरोपी वडील अजय याला अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश येथे टीम रवाना करण्यात येणार असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here