Home Top News बीड मतदार संघातील 3 पैकी 2 ग्रामपंचायत माजीमंत्री क्षीरसागर यांच्या ताब्यात

बीड मतदार संघातील 3 पैकी 2 ग्रामपंचायत माजीमंत्री क्षीरसागर यांच्या ताब्यात

0
76

बीड:  जिल्ह्यातील तीन तालुक्यात 13 ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले त्यापैकी बीड मतदार संघातील गवळवाडी अंथरवन पिंपरी-गणपुर आणि अंथरवण पिंपरी तांडा या तीन ग्रामपंचायतीसाठी मतदान झाल्यानंतर आज शुक्रवारी या तीनही ग्रामपंचायत चा निकाल जाहीर झाला आहे यापैकी अंथरवणपिंपरी- गणपुर व अंथरवन पिंपरी तांडा या दोन ग्रामपंचायतीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले आहेत

या निवडणुकापूर्वीच मतदार संघातील झालेल्या सेवा सोसायट्या निवडणुकीत जवळपास 90 टक्के सोसायट्यावर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले आहेत,ग्रामपंचायत आणि सेवा सोसायटीच्या निवडणुकीत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी वर्चस्व निर्माण केले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे,विद्यमान आमदार यांना अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागत आहे
अशोक शिंदे यांच्या नेत्रत्वात अंथरवन पिंपरी ग्रामपंचायत निवडणुकीत अशोक शिंदे,कांताबाई भगवान पुरभे,गोवर्धन नामदेव वाघमारे, शिवगंगा भाऊराव प्रभाळे, पुष्पबाई जालिंदर शिंदे,विद्या संतोष शिंदे,आणि अपक्ष अशोक संतराम शिंदे हे उमेदवार निवडून आले आहेत तर दिनेश लाला पवार यांच्या नेतृत्वाखाली अंथरवन पिंपरी तांडा येथील 7 पैकी 7 उमेदवार निवडून आले असून यात पवार दिनेश लाला, विमल रामभाऊ पवार, पांडुरंग काशिनाथ पवार, कमलबाई बाबू पवार,रमाबाई मोहन राठोड, अनिता दिनेश पवार,प्रेमदास मोहन राठोड हे उमेदवार निवडून आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here