Home Top News गवळवाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

गवळवाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

0
71
प्रारंभ वृत्तसेवा

बीड : तालुक्यातील गवळवाडी ग्रामपंचायत  शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप व मकरंद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ताब्यात आली.  7 पैकी 7 उमेदवार दणदणीत विजयी झाल्यामुळे शहरातील शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांनी आनंद साजरा केला.

बीड तालुक्यातील गवळवाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली. शिवसेना उप तालुका प्रमुख गणेश मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गवळवाडी येथील श्री.नगद नारायण युवा परिवर्तन ग्रामविकास पॅनल चा दणदणीत विजय झाला. सात पैकी सात जागा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.  यात नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य  वर्षा युवराज मस्केल गणेश आण्णाभाऊ मस्के, पूजा बाळासाहेब मस्के, अमृता बाबू मस्के, भागवत भास्कर मस्के, पांडुरंग गणपती मस्के, रंदावणी अनुरथ मस्के या सदस्यांचा विजय झाला. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जालना रोड येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या वतीने विजय जगताप, आकाश जगताप यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघण, माजी सरपंच संदीपान बडगे, युवासेना बीड तालुका प्रमुख जगदीश उबाळे, युवराज मस्के, चंद्रसेन काळे, नामदेव म्हेत्रे, लक्ष्मण मस्के, उध्दव मस्के, बाळासाहेब मस्के, भीमराव मस्के, दीपक साबळे, किसन मस्के, ज्ञानेश्‍वर मस्के, पप्पू मस्के, सतीश शिंदे, बंडू मस्के, राम काळे, बाळू काळे, आकाश मस्के, भारत गाडे, कृष्णा मस्के, ऋषी मस्के यांच्यासह गवळवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here