Home Top News धक्कादायक; पतीची आत्महत्या तर पत्नीचा मृतदेह आढळला

धक्कादायक; पतीची आत्महत्या तर पत्नीचा मृतदेह आढळला

0
64

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील घटना; ११ महिन्या पुर्वीच झाले होते लग्न

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : तालुक्यातील नव दाम्पत्यांनी जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. पतीने गळफास घेतला तर पत्नीचा मृतदेह आढळून आला. नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मयत राजेश जगदाळे वय 25 याने गळफास तर मयत पत्नी दिपाली राजेश जगदाळे वय 20 रा.वैतागवाडी हिचा मुत्यदेह रुम मध्ये आढळून आला. दोघांचेही मृतदेह एकाच रुम मध्ये होते. आत्महत्याचे कारण माञ समजू शकले नाही. गेल्या आकरा महिन्यापुर्वी दोघांचे लग्न झाले होते व मयत दिपाली सात महिन्याची गर्भवती असल्याचे समजते. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here