Home Top News तुम्ही धनंजय मुंडेचे एसपी आहात की जनतेचे..!

तुम्ही धनंजय मुंडेचे एसपी आहात की जनतेचे..!

0
71

तुम्ही धनंजय मुंडेचे एसपी आहात की जनतेचे-किरीट सोमय्या

जगमित्र प्रकरणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

प्रारंभ । वृत्तसेवा
बीड :- बीडचा दौरा म्हटलं की या दौऱ्याची सुरुवात धमक्यांनी होते परंतु मी या धमक्यांना भीत नसून येथील जगमित्र प्रकरणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहे. परंतु याठिकाणी आल्यानंतर मला धमक्या आल्यानंतर येथील एसपींनी याची कोणतीच दखल घेतलेली नाही. यामुळे हे एसपी धनंजय मुंडेचे आहेत की महाराष्ट्राच्या जनतेचे असा प्रश्‍न भाजपाचे नेते खासदार किरीट सोमय्या यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

 

विविध प्रश्‍नाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या आलेले असताना त्यांना काल रात्रीपासूनच धमक्या येत असल्याचे मत त्यांनी रात्रीच व्यक्त केले होते. आज सकाळी अंबाजोगाई येथील भाजपा आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी भेट दिली. याच ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घालत जगमित्र कारखान्याच्या जमीन घोटाळ्यात  अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचेही मत व्यक्त केले. यासह मोदी सरकारने मला झेड सुरक्षा दिलेली आहे. त्या सुरक्षेची जबाबदारी येथील एसपी आणि पोलीसांची आहे परंतु याठिकाणी आल्यानंतरही मला धमक्या मिळाल्या होत्या तरी सुद्धा येथील एसपींनी कोणतीच ॲक्शन न घेतल्याने मी त्यांची तक्रार दिल्लीचे कॅबिनेट सचिव आणि गृहसचिवांकडे करणार असल्याचे मतही यावेळी सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here