Home Top News दुर्दैवी घटना; पुराच्या पाण्याने घेतला दोघांचा बळी

दुर्दैवी घटना; पुराच्या पाण्याने घेतला दोघांचा बळी

0
1125
धारुर तालुक्यातील घटना; पाणी वाहत असलेल्या पुलावरुन जाणे टाळा!

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : धारुर तालुक्यातील चिंचपुर येथील पुलावरुन पाणी वाहत होते. याच दरम्यान रविवारी (ता. 26) रात्री या पाण्यात दोघे जण वाहून गेली होती. यात दोघांचा मृत्यू झाला.


सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील छोटे मोठे नदी, नाले वाहत आहेत. अनेक वेळा पुराच्या पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेकांना जिव गमवावा लागतो. अशीच घटना रविवारी रात्री धारुर तालुक्यातील चिंचपुर परिसरात घडला. महादेव सोनवणे वय 45 व उत्तम सोनवणे (दोघेही रा. उंदरी ता. केज) हे दोघेही चिंचपुर येथील पुलावरुन जात असताना त्यांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते वाहून गेले होते. यात रविवारी रात्री महादेव सोनवणे यांचा तर सोमवारी सकाळी उत्तम सोनवणे यांचा मृतदेह सापडला. अशा घटना रोखण्यासाठी नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here