Home Top News कत्तलखान्यात जाणाऱ्या 49 गाईंची सुटका

कत्तलखान्यात जाणाऱ्या 49 गाईंची सुटका

0
86

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई

बीड । प्रतिनिधी
कत्तलखान्याकडे गाई घेवून जात असलेली तीन वाहने नेकनूर परिसरामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पकडली. या वाहनातील 49 गाई-व वासरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.
मांजरसुंबा परिसरातून 49 गाई व वासरे घेवून जाणाऱ्या 3 वाहनांना आडवून वाहनातील 49 गाईची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पो.नि.विलास हजारे यांच्या टिमने केली. या प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधीतावर गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here