Home Gate Way OF india शिंदेंच्या बंडाचा बीड मध्ये निषेध; 42 शिवसैनिकांनी मुंडन करुन केला एकनाथ शिंदेचा...

शिंदेंच्या बंडाचा बीड मध्ये निषेध; 42 शिवसैनिकांनी मुंडन करुन केला एकनाथ शिंदेचा निषेध

0
72
बीड प्रतिनिधी :  आज दि.25 जून रोजी धानोरा रोड येथे जिल्हासंघटक रतन गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांनी 42 आमदार फोडल्यामुळे 42 शिवसैनिकांनी मुंडन करुन त्यांचा निषेध केला.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा संघटक रतन गुजर म्हणाले की एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे साहेबांनी महत्वाची पदे दिली तरीही त्यांनी शिवसेनेला त्रास देत आहे शेवटी सत्य परेशान हो सकता है पराजित नाही शिवसैनिक नक्कीच वापस येतील आणि नाही जरी आले तरी शिवसेनेमध्ये ताकत आहे पुन्हा जोमाने उभे करण्याची आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेशी गद्दारी करणार नाहीत शिवसेनेचा एक-एक माणूस निवडून आणू आणि पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांचे आणि आदित्य ठाकरे साहेबांची मान उंचावू. उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील कोटी संख्येने जनता आहे.
शिवसेनेचे विभाग प्रमुख हनुमान भैरवाड, शिवाजी माने, चंद्रशेखर कवडे, ,आबा मगर, सुरेश जगताप,  बाळासाहेब तांदळे, राजाभाऊ गायकवाड, लक्ष्मण लांडगे, आबा मगर, अशोक मोरे, रफिक पठाण, खाजा भाई  शेख,  कृष्णा सावंत, अर्जुन मांडे, देवराव भोसले, राधा कृष्ण अर्जुन निर्मळ, महादेव जाधव, राजाभाऊ पिंगळे, महादेव जाधव,  प्रकाश गोकुळे, प्रकाश वाघमारे, मसु आबा लांडगे, संजय गायकवाड आदींची उपस्थिती यावेळी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here