Home Gate Way OF india पाहा विडिओ | 10 वीच्या परीक्षा रद्द! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी...

पाहा विडिओ | 10 वीच्या परीक्षा रद्द! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

0
300

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, या संदर्भात काही असेसमेंट घ्यायच्या असतील तर त्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून या सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here