Home G-Global लिहून घ्या हे सरकार कोसळणार – आदित्य ठाकरे

लिहून घ्या हे सरकार कोसळणार – आदित्य ठाकरे

0
101

मनमाड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे 12 खासदारदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. आज मनमाड दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यमान सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सरकार कोसळणार आहे, असे खळबळजनक विधान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here