Home G-Global देशात 24 तासात कोरोना बाधितांची विक्रमी नोंद

देशात 24 तासात कोरोना बाधितांची विक्रमी नोंद

0
354
  • प्रारंभ वृत्तसेवा
  • बीड : देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून येथील आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. गेल्या 24 तासात देशात दोन लाख 61 हजार 500 नव्या रुग्णांची भर पडली. तर 1 हजार 501 कोरोना बाधितांचा यात मृत्यू झाला आहे.

 

  • कोरोनाची दुसरी लाट देशात सक्रीय झाली असून येथील चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासात रुग्णांची संख्या वाढत जरी असली तरी कमी होणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. यामुळे काही प्रमाणात देशाला याचा दिलासा मिळत आहे. 24 तासात देशात 1,38,423 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आपल्या देशात आता पर्यंत एक कोटी 47 लाख 88 हजार 109 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.

 

  • सध्या देशात एक कोटी 28 लाख 9 हजार 643 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. राज्यात 6 लाख 47 हजार 933 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. सध्याचे वाढते आकडे आपल्या सर्वांची काळजी वाढवणारे आकडे आहेत. यात आता आपल्या सर्वांना काळजी पुर्व ही लढाई जिंकण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here