Home Top News मुख्यमंत्र्यांचे जीवलग ‘मित्रा’ला सरप्राईज : नियोजनात नसताना आ. जोशींना भेटून दिल्या वाढदिवसाच्या...

मुख्यमंत्र्यांचे जीवलग ‘मित्रा’ला सरप्राईज : नियोजनात नसताना आ. जोशींना भेटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

0
55

नागपूर : आमदार संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासूनच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छुकांची गर्दी उसळली होती. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक शुभेच्छा देण्यासाठी रांगेत उभे होते. मात्र दुपारी मिळालेल्या एका सरप्राईजने संदीप जोशींचा आनंद द्विगुणित झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपुरात दाखल होऊन त्यांनी आपल्या जिवलग मित्राला प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीचे कोणतेही नियोजन आधी नव्हते. दुपारी बारा वाजता अचानक मुख्यमंत्री समोर आले आणि त्यांनी “हॅपी बर्थडे” म्हणत शुभेच्छा दिल्या. हा क्षण आ. जोशींसाठी सुखद धक्का ठरला.

यानंतर जवळपास अर्धा तास दोन्ही मित्रांमध्ये ‘चाय पे चर्चा’ रंगली. जुन्या आठवणींना उजाळा देत, भविष्यातील योजनांवरही गप्पा झाल्या. आपल्या मित्राकडून अशा प्रकारे मिळालेल्या शुभेच्छा प्रेरणादायी असून, या मैत्रीचा धागा अधिक बळकट झाल्याची भावना आ. संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस आणि आ. जोशी यांची घट्ट मैत्री सर्वश्रुत आहे. त्याचा प्रत्यय आजच्या या सरप्राईज भेटीतून पुन्हा एकदा आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here