Home Top News बिग ब्रेकिंग; सत्ता संघर्षामध्ये शिंदे गटाला दिलासा!

बिग ब्रेकिंग; सत्ता संघर्षामध्ये शिंदे गटाला दिलासा!

0
68

शिवसेना चिन्ह व शिवसेना नाव शिंदे गटाला मिळाले!

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर अनेक प्रलंबित प्रश्न न्याय दरबारी असताना आज निवडणूक विभागाने शिंदे गटाला शिवसेना चिन्ह व शिवसेना नाव शिंदे गटाला दिल्यामुळे खऱ्या अर्थाने आता शिंदे गटाचा विजय झाल्याचे दिसत आहे. यानंतर 22 फेब्रुवारीला सत्ता संघर्षाचा निकाल सुद्धा लागण्याची दाट शक्यता आहे. या लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांना माञ निराशा मिळू लागली आहै.

राज्यामध्ये शिंदे गट बाजूला पडल्यानंतर आघाडी सरकार पडले यानंतर शिंदे गट व भाजपा ने एकत्र येत सरकार स्थापन केले. सरकार स्थापन झाल्यापासून अनेक प्रश्न न्याय दरबारी प्रलंबित होते. परंतु आज निवडणूक विभागाने शिवसेना चिन्ह व शिवसेना नाव हे शिंदे गटाचे असल्याचे सांगितल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांना मोठा झटका या निर्णयामुळे बसला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला मात्र याचा आता मोठा फायदा होणार आहे. येणाऱ्या 22 फेब्रुवारीला सुद्धा सत्ता संघर्षावर निकाल लागण्याची शक्यता असून निकाल लागल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका सुद्धा लवकरच होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here