Home Top News पहिल्या प्रियकराचा दुसर्या प्रियकराला हाताशी धरुन काढला काटा!

पहिल्या प्रियकराचा दुसर्या प्रियकराला हाताशी धरुन काढला काटा!

0
66

त्याने फक्त आठ हजारासाठी व कवितासाठी दत्ताचा केला खुन!

१२ तासात स्थानिक गुन्हे शाखेने लावला खुनाचा छडा
दत्ता इंगळे खून प्रकरणाला वेगळे वळण
सात दिवसाचा पिसीआर देण्याची मागणी!

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : दिवसेंदिवस जिल्ह्यामध्ये अनैतिक संबंधातून वेगवेगळ्या घटना घडू लागल्या आहेत. शनिवारी (ता. २०) पहाटे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत खून झालेल्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून दत्ता इंगळे यांचा खून त्यांच्या प्रियसीने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने फक्त आठ हजार रुपये देऊन केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी प्रियसीला व तिच्या दुसऱ्या प्रियकरला ताब्यात घेतले असून सात दिवसाचा पीसीआर देण्याचे मागणी केली आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासात या खुनाचा छडा लावून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या प्रकरणात योग्य त्या सूचना केल्यामुळे तपासाला गती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ व त्यांच्या टीमने ही कामगिरी केल्यामुळे या टीमचे कौतुक होत आहे.

दत्ता राधाकिशन इंगळे वय ४०, (रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार) यांचा शनिवारी खुन झाला होता. नेमका कोण कोणत्या कारणाने झाला हि माहिती मात्र काल समजू शकली नव्हती. यात शिवाजी पोलिसांनी यंत्रणा हलवत काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला आहे. खून प्रकरणात दत्ता इंगळे यांचा खून त्यांच्याच प्रियसीने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने केला आहे दुसऱ्या प्रियराला फक्त आठ हजार रुपये देऊन हा खून केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियसी कविता अजिनाथ इंगळे वय 30 (ता. हिवरसिंगा ता. जि.बीड) व कविताचा दुसरा प्रियकर सतिष बेलु जाधव वय २६ (रा.जाधव वाडी ता.बीड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अजून दुसरे दोन जण असुन या अनूषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींना सात दिवसाचा पीसीआर देण्यात यावा अशी मागणी पोलिसांच्या वतीने कोर्टात करण्यात आली आहे.

अनैतिक संबंधाने दत्ताचा घेतला जीव

दत्ता राधाकिसन इंगळे हे बीड शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. शहरातील धानोरा रोड परिसरात त्याची प्रेयसी कविता राहत असल्यामुळे ते गेल्या काही दिवसापासून धानोरा रोड परिसरातच राहत होते. परंतु अंतर्गत वादातून कविताने तिच्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने दत्ताचा काटा काढला या अनैतिक संबंधामुळ दत्ताला आपला जीव गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here