Home Top News बीड जिल्ह्यात उद्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे यांचा  झंझावती दौरा –  राजेंद्र मस्के

बीड जिल्ह्यात उद्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे यांचा  झंझावती दौरा –  राजेंद्र मस्के

0
72

बीड प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 निवडणुकीसाठी उभे असलेले भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई आठवले गट, रयत क्रांती संघटना व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. पाटील किरण नारायणराव यांच्या  प्रचारासाठी 20 जानेवारी रोजी भाजप प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे,  लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे, जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडें भाजपा निवडणूक प्रभारी आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक मेळावे संपन्न होत आहे.

या कार्यक्रमास आ.सुरेश आण्णा धस,आ.लक्ष्मण आण्णा पवार, आ.नमिताताई मुंदडा, माजी आ. आर.टी.देशमुख, माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ. आदिनाथरावजी नवले, भाजपा नेते रमेशराव आडसकर, मोहन जगताप, प्रवक्ते राम कुलकर्णी, ॲड. सर्जेराव तांदळे,प्रा.देवीदास नागरगोजे,नवनाथ शिराळे,  आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्या दि.20 रोजी गेवराई, बीड, अंबाजोगाई येथे भव्य शिक्षक मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांना बीड जिल्ह्यातील शिक्षक मतदारांच्या मधुन प्रचंड प्रतिसाद मिळत असुन, गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात  त्यांचा असलेला जनसंपर्क दांडगा आहे.

शिक्षण संस्था चालवताना शासकिय शिक्षण मंडळावर देखील सदस्य या भुमिकेत त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या प्रश्नावर धडपडणारा आणि मदतीला धावून येणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडणुक प्रचारासाठी उद्या दि.20 रोजी पुढीलप्रमाणे  मान्यवरांचा बीड जिल्ह्यात झंझावाती दौरा संपन्न होणार असल्याची माहिती राजेंद्र  मस्के यांनी दिली आहे.

20 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वा. गेवराई येथे शिक्षक मेळावा स्थळ–गोदावरी मंगल कार्यालय गेवराई, दुपारी 12.00 वा.  बीड- शिक्षक मेळावा –स्थळ – स्वा. सावरकर महाविद्यालय बीड, सायंकाळी 5.30 वा. अंबेजोगाई–खोलेश्वर महाविद्यालय येथे शिक्षक मेळावा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शिक्षक बांधव सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंखेने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर बावनकुळे, लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत 20 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वा.सूर्यां लॉंन्स कॅनॉल रोड बीड येथे–बीड जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सर्व जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सर्व मोर्चा प्रमुख पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख आदि सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here