Home Top News लोकशाही आणि लोक प्रतिनिधीचा आवाज दाबणाऱ्या शिंदे -फडणवीस सरकारचा धिक्कार असो!

लोकशाही आणि लोक प्रतिनिधीचा आवाज दाबणाऱ्या शिंदे -फडणवीस सरकारचा धिक्कार असो!

0
64

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे निलंबन मागे घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बीड  प्रतिनिधी  – महाराष्ट्रतील शेतकरी, गोरगरीब जनता, विद्यार्थी,बेरोजगार यांच्या समस्या सोडविण्यास शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरले असून सभागृहामध्ये लोकप्रतिनिधीच्या प्रश्नांची उत्तरे न देता निलंबनाची कारवाई करून लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम करीत असून या दडपशाहीला न घाबरता शेतकरी जनतेच्या प्रश्नांसाठी खा.शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.अजित दादा पवार, आ.जयंत पाटील साहेब,आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सज्ज असून शिंदे -फडणवीस या शिवद्रोही सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करणार आहे. सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून सभागृहात आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधीवर निलंबनाच्या शस्त्राने वार करत आहेत.प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास आंदोलनाची नवीन दिशा ठरविण्यात येईल असे इशारा आ.संदीप क्षीरसागर यांच्या सुचनेवरून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड मतदार संघातील पदाधिकारी, विविध आघाडीचे प्रमुख, महिला आघाडी, ममाजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, नवनिर्वाचीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here