Home Top News शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माजलगाव तालुकाप्रमुखपदी भगीरथ तोडकरी

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माजलगाव तालुकाप्रमुखपदी भगीरथ तोडकरी

0
95

 

विशेष प्रतिनिधी

माजलगाव : आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माजलगाव तालुकाप्रमुखपदी वर्तमानचे मुख्य संपादक भगीरथ तोडकरी यांची निवड झाली आहे. मुंबई येथे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी तोडकरी यांना नियुक्तीचे पत्र देवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्यासह केरळ राज्यातही आपल्या कार्याचा ठसा उमटवून आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माजलगाव तालुका समन्वयक म्हणून भगीरथ तोडकरी यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेनाप्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मार्गदर्शक एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते तथा माजी चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या सूचनेवरून कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सदर निवड केली आहे. दरम्यान, भगीरथ तोडकरी यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि स्वागत होत आहे. आपल्या निवडीनंतर भगीरथ तोडकरी म्हणाले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुका समन्वयकपदी निवड करून माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असेही तोडकरी म्हणाले.

============बाॅक्स==========

गरजू आणि पात्र रूग्णांनी संपर्क साधावा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गरजू, पात्र आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रूग्णांनी वैद्यकीय मदतीसाठी माजलगावस्थित कार्यालयाशी संपर्क साधावा. आरोग्य क्षेत्रातील विविध योजना आणि मदतीबाबत माजलगाव तालुक्यातील जनतेने +91 74999 34141 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक भगीरथ तोडकरी यांनी केले आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रकाश सोळंके यांच्या कुशल मार्गदर्शनाने आरोग्य क्षेत्रात व्यापक काम करणार असल्याचे भगीरथ तोडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here