Home Top News बीड जिल्हा बंदला व्यापारी महासंघाचा पाठींबा : संतोष सोहनी, विनोद पिंगळे

बीड जिल्हा बंदला व्यापारी महासंघाचा पाठींबा : संतोष सोहनी, विनोद पिंगळे

0
69

बीड  : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षपार्ह विधान केल्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवीन्याच्या मागणीसाठी 12 डीसेंबर रोजी तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीने निषेध मोर्चा काढन्यात येणार असुन बीड जिल्हा बंदची हाक सर्वपक्षीय शिवप्रेमी कडून देण्यात आली आहे. तसेच सर्वपक्षीय शिवप्रेमींनी बीड जिल्हा व्यापारी महासंघ कॅट ला ही विनंती केली आहे की आपण या बंदमध्ये सहभाग नोंदवावा त्या अनुषंगाने बीड जिल्हा बंद मध्ये शहर व बीड जिल्ह्यातील व्यापारी बांधव सहभागी होणार आहेत. या बीड जिल्हा बंदला जील्हा व्यापारी महासंघाने पाठींबा दिला आहे. बीड जिल्हा बंद मध्ये शहर व जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जील्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे, जिल्हा महासचीव भास्करराव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष सुर्यकांत महाजन, प्रमोद निनाल, मह्हमद लईक अहेमद, दत्तप्रसाद तापडिया, राजेन्द्र मुनोत, सुरेश बरगे गेवराई, संजय सोळंके तालूकाध्यक्ष माजलगाव, विनायक मुळे वडवनी, विजयकुमार अन्डील, सुनिल कलंत्री तेलगाव, प्रकाश कांनगावकर, महादेव सूर्यवंशी केज, ज्ञानोबा माऊली फड, संतोष अब्बड, प्रमोद निनाल, भास्करराव जाधव, बालकीसन तापडीया, रुपेश गडम, नितीन गोपन, कृष्णा मूंदडा, सुरेन्द्र रुपकर, राहुल साई लोहिया, तुकाराम काले, निलेश कोठारी, प्रवीण कापरे, हीरालाल बलदोटा, अनंत कोटेचा यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here