Home Top News बीडमध्ये दोन दिवसीय होणाऱ्या इज्तेमाहला उत्साहात सुरुवात

बीडमध्ये दोन दिवसीय होणाऱ्या इज्तेमाहला उत्साहात सुरुवात

0
71

ठिकठिकाणी स्वयंसेवकाची शिस्तबद्ध सेवा

जिल्हाभरातून मुस्लिम बांधव इज्तेमाहस्थळी येण्यास सुरुवात

पोलीस प्रशासनाचाही चोख बंदोबस्त

बीड । प्रतिनिधी : बीड शहरापासून जवळ असलेल्या काकडहिरा परिसरामध्ये दोन दिवसीय इज्तेमाह होत असून यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. सकाळपासूनच याठिकाणी जिल्हाभरातून मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत. शहरात ठिकठिकाणी इज्तेमाहसाठी येणाऱ्या बांधवांसाठी चहा-नाष्टाची सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे. तसेच वाहतूक कोंडी होवू नये यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक शिस्तपद्ध सेवा करत आहेत. दोन दिवस होणाऱ्या इज्तेमाहमध्ये लाखो बांधव हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असून या अनुषंगाने याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या दिड महिन्यांपासून इज्तेमाहची तयारी करण्यात येत असून बीड शहरापासून जवळ असलेल्या काकडहिरा परिसरात 80 एक्कर परिसरात आज व उद्या इज्तेमा होत आहे. साडेसातशे बाय पाचशेचा पँडाल याठिकाणी उभारण्यात आला असून पार्कींगसाठी स्वतंत्र सोय, शौचालय यासह स्टॉलसुद्धा उभारण्यात आले आहेत. जिल्हाभरातून येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी याठिकाणी विशेष सोय सुद्धा करण्यात आली आहे. सकाळपासूनच याठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. इज्तेमाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सुद्धा चोख नियोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here