Home Top News ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला लागलेल्या आगीतून संशयाच्या ज्वाला

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला लागलेल्या आगीतून संशयाच्या ज्वाला

0
68

बुधवारी रात्री लागलेल्या आगीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जुन्या फाइली जळून खाक

रात्री लागलेल्या आगीत कोणत्याही महत्त्वाच्या फाईली जळाल्या नाहीत, सर्व महत्त्वाच्या फाईली जिल्हा परिषद इमारतीत सुरक्षित-मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : बीड शहरातील धानोरा रोड परिसरात असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एका रुमला बुधवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये जुन्या फाईल जळाल्या असून या फाईल मागील काही वर्षांमध्ये राबवण्यात आलेल्या योजनेच्या असल्याचे मत अनेक समाजसेवकांनी व्यक्त केले आहे. यामुळे या आगीतून संशयाच्या ज्वाला निघत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याशी प्रारंभने संपर्क साधला असता ते म्हणाले की आगीत कोणत्याही महत्त्वाच्या फाईल नव्हत्या, सर्व महत्त्वाच्या फाईल ह्या जि.प.इमारतीत सुरक्षित असल्याचे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here