Home Top News Beed : आष्टीत घरफोडी; 96 हजारांचा मुद्देमाल लंपास

Beed : आष्टीत घरफोडी; 96 हजारांचा मुद्देमाल लंपास

0
62

आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : आष्टी शहरातील तेलीगल्ली येथील घरात कोणीच नसल्याचा अंदाज घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील सोन्याचांदीचे दागिणे लंपास केले. यात एकूण 96 हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याची फिर्याद आष्टी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिपमाला विवेक उरणे (वय 39) रा.तेलीगल्ली आष्टी यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे व रोखरक्कम असा एकूण 96 हजाराचा ऐवज लंपास केला. उरणे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here