Home Top News Beed : जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरीस

Beed : जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरीस

0
73

बीड । प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून दिवसाला 1-2 दुचाकी चोरी जात आहेत. सोमवारी बीड जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरी गेल्या असून यात एक दुचाकी नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतून तर दुसरी दुचाकी गेवराई पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेली आहे. तक्रारदारांच्या फिर्यादीवरून दोन्ही पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रोहण राजाभाऊ लोनकर (वय 19) यांनी त्यांची दुचाकी (जी.जे.5-एफ.क्यू-8439) गढी येथील कॉलेजसमोर लावली असताना अज्ञात चोरट्याने दुचाकीचे हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास केली तर शहाजी रावसाहेब भोसले (वय 42) यांची दुचाकी (एम.एच.23 व्ही 6109) नेकनूर येथील बाजारतळावर लावली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here