Home Top News ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली ताकद 

ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली ताकद 

0
66
बीड  प्रतिनिधी  : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाली आहे. बीड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या चौसाळा येथील जेष्ठ नेते तानाजी थोरात आणि ग्रामपंचायत सदस्य युवा नेते मारुती जाधव यांनी आ. संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बीड तालुक्यातील चौसाळा येथील असंख्य कार्यकर्ते आ. संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. चौसाळा येथील ग्रामपंचायत सदस्य युवा नेते मारुतीभैय्या जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जेष्ठ नेते सयाजी बाप्पा शिंदे , श्रीमंत सोनवणे दत्ता जाधव , गणेश काकडे आदी उपस्थित होते. त्याच बरोबर चौसाळा येथील जेष्ठ नेते
तानाजी थोरात यांनीही आ. संदीपभैय्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केले. या वेळी सयाजी बाप्पा शिंदे,  शिकुर सौदागर , अण्णासाहेब जाधव, सुधीर नाईकवाडे ,  दत्ता जाधव उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार संदीपभैय्या क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने चौसाळा आणि बालाघाट परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here