Home Top News कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमा केल्यासंबंधी आ.धसांवर गुन्हा दाखल

कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमा केल्यासंबंधी आ.धसांवर गुन्हा दाखल

0
72

आ.सुरेश धसांसह पत्नी प्राजक्ता सुरेश धस, देविदास धस, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान यांच्यासह इतर जणांचा गुन्ह्यामध्ये समावेश
.सुरेश धसांनी पदाचा गैरवापर करून कमावली बेनामी संपत्ती
देवस्थान इनाम जमीन, शासनाच्या जमिनी, सहकार विभागाच्या जमिनी
संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार करून लाटल्या जमिनी
सुरेश धसांच्या अडचणी वाढल्या

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : माजी मंत्री तथा आमदार सुरेश धस यांच्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा आष्टी तालुक्यातील आठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस, बंधू देविदास धस, मनोज रत्नपारखी , अस्लम नवाब खान यांच्यासह इतरांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आ.सुरेश धसांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून आष्टी मतदारसंघामध्ये मात्र सुरेश धसांची प्रतिमा मलीन होताना दिसत आहे. याचप्रकरणी सुरेश धस सर्वोच्च न्यायालयात गेले होते परंतु त्यांना त्याठिकाणी दिलासा न मिळाल्यामुळे हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे हे करत असून यात अजून मोठे सत्य बाहेर येण्याची शक्यता सुत्रांकडून मिळत आहे.
जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करीत आहेत. खाडे यांच्याच याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 ऑक्टोबर रोजी राम खाडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. खाडे यांनी आपल्या तक्रारीत आ. सुरेश धस यांचे नाव घेतलेले असल्याने आ. सुरेश धस यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवीत आ.सुरेश धस यांची याचिका फेटाळली आहे. दरम्यान, तक्रारदार राम खाडे यांची 13 जानेवारी 2022 ची तक्रारच एफआयआर समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्यानुसार 29 रोजी कलम 13(1)(अ) (ब),13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988सह कलम- 420,465,467,468,471,120 (ब)109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.
आमदार धस यांनीपदाचा गैरवापर करून इतर आरोपींशी कट करून देवस्थानाच्या इनाम जमीन, शासनाच्या जमीन, सहकार विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत,असे भासविले. देवस्थानच्या इनाम जमिनी बेकायदेशीर मार्गाने खालसा आदेश करून घेऊन मनोज रत्नपारखी व इतरांच्या नावे करून शासनाची फसवणूक केली. व बेकायदेशीर मार्गाने स्वतः चे व इतरांचे नावाने कोट्यावधी रुपयाची अपसंपदा मिळवली असा ठपका ठेवला आहे.

या देवस्थान जमिनी लाटल्यामुळे धस अडचणीत

बीडच्या आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्‍वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here