Home Top News चक्क सालगड्यानेच शेतातील साडे आठ लाखाचा माल लंपास केला

चक्क सालगड्यानेच शेतातील साडे आठ लाखाचा माल लंपास केला

0
70

शेतकर्याच्या फिर्यादीवरुन सालगड्यावर बर्दापुर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंद

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतकऱ्याचा शेतमाल चक्क सालगड्यानेच लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात सालगडाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जगन्नाथ धोंडीराम मामडगे (वय ७३ व्यवसाय पेन्शनर व शेती रा सेलुअंबा ता अंबाजोगाई) यांच्या शेतातील सोयाबीन चे २२० कटटे (केडी एस ७५३ कंपनीचे सोयाबीन असलेले २२० कटटे प्रति कटटा ६५ किलो असलेले एकुण १४३ क्विंटल प्रक्विं. ६०००रू प्रमाणे एकुण ८,५८,०००रू चा माल) शेतमालकाला काही एक न सांगता चोरुन नेला. शेतकरी मामडगे यांच्या फिर्यादीवरुन अनिल भाउराव तिखंडके, भाउराव अमृतराव तिखंडके, संगिता अनिल तिखंडके, मंगलताई भाउराव तिखंडके (सर्व रा नागमाथा ता सेनगाव जि हिंगोली) यांच्यावर बर्दापुर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here