Home Top News राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना राज्यपाल पदावरून हटवा

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना राज्यपाल पदावरून हटवा

0
94

जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगतसिंह कोशारी यांना जोडे मारो आंदोलन

प्रारंभ । वृत्तसेवा
वारंवार महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून सतत काही ना काही बोलून राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी ंहे राज्यातील महापुरुषांचा अवमान करत असल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने भगतसिंह कोशारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात कोशारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार काही ना काही अपशब्द वापरताना दिसत आहेत. तसेच इतर महापुरुषांबद्दल सुद्धा त्यांनी अवमानकारक शब्द वापरलेले आहेत, या सर्व बाबीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने तिव्र निदर्शणे करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला, तात्काळ राज्यपाल पदावरून भगतसिंह कोशारी यांना हटवण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ थोटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here