Home Top News अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत गुळजचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत गुळजचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

0
66

गेवराई  प्रतिनिधी :  गेवराई तालुक्यातील मौजे गुळज येथील भाजपा-सेनेचे सक्रिय कार्यकर्ते रामेश्वर घनवट, कुंडलिक बडे, मच्छिंद्र सारूक, प्रविण घनवट यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

      यावेळी अण्णासाहेब गवारे, विक्रम गवारे, हनुमान कदम, सिराज मिर्झा, निजाम शेख, लियाकत सय्यद
यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे शेकटा सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल ने बाजी मारली असून पॅनलचे सर्व अकरा उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांनी कृष्णाई येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांची भेट घेतली.
अमरसिंह पंडित यांनी विजयी उमेदवार सर्वश्री भारत शेंबडे, भिमा नरुटे, आसाराम शेंबडे, प्रभात शेंबडे, भाऊसाहेब शेंबडे, शंकर शेंबडे, संजय शेंबडे, बाबासाहेब हापटे, शांताबाई चौधरी, शांताबाई शेंबडे, गणपत कांबळे आदींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here