Home Top News एएसपी सुनिल लांजेवार यांची औरंगाबादला बदली; बीडचे नवे एएसपी सचिन पांडकर

एएसपी सुनिल लांजेवार यांची औरंगाबादला बदली; बीडचे नवे एएसपी सचिन पांडकर

0
71

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी बीड मध्ये चांगले काम केल्यामुळे त्यांची सर्वसामान्यात एक चांगली प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा बीड मधील कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे आज (ता. ०७) त्यांची बदली औरंगाबाद (ग्रामीण) ला झाली असून त्यांच्या जागी सचिन पांडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले असून यात अनेक अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बीड मध्ये खाकीतील देवमाणूस म्हणून ज्यांनी चांगले काम केले असे अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांची बदली औरंगाबाद (ग्रामिण) ला झाली आहे. सुनिल लांजेवार यांनी बीड मध्ये आगळेवेगळे काम करुन येथील सर्वसामान्यात पोलीस व वर्धीतील अंतर कमी केले होते, यामुळे सर्वसामान्य व पोलीसातील अंतर कमी झाले होते. एक अधिकारी म्हणून त्यांचे काम नेहमीच बीडकरांना आठवणीत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here