Home Top News भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची गोळी झाडून आत्महत्या

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची गोळी झाडून आत्महत्या

0
100

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ११) दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हारुग्णालयात मिञ परिवार व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जिल्हा रुग्णालयात खासदार प्रितम मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार उपस्थित आहेत.

 

भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत. त्यांनी आज त्यांच्या राहात्या घरात गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परीसरात हितचिंतकांनी गर्दी केली आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच खासदार प्रितम मुंडे जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. सतत आनंदी असणारे भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे माञ समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here