Home Top News केज-मांजरसुंबा रोडवरील कोरेगाव नजीक स्कूल बसचा आणि मोटरसायकलचा अपघात; दोघेजण ठार तर...

केज-मांजरसुंबा रोडवरील कोरेगाव नजीक स्कूल बसचा आणि मोटरसायकलचा अपघात; दोघेजण ठार तर एकजण गंभीर जखमी

0
79

केज प्रतिनिधी : केज – मांजरसुंबा रोडवर एका मोटार सायकलचा आणि शाळेच्या गाडीचा अपघात होऊन त्यात मोटार सायकल वरील एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

केज-मांजरसुंबा रोडवरील कोरेगाव जवळ शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास बन्सल क्लासेसच्या रस्त्यात उभ्या असलेल्या गाडी क्र. एम एच-४४ /९९९६ ला मोटार सायकलीने क्र. एम एच -१३/बी जे ८५७४ ने जोराची धडक दिली. यात मोटार सायकलवरील सुनील मधुकर शिंदे वय २५ वर्ष रा. पिंपळगाव ता. केज हा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू पावला तर भागवत कल्याण पवार वय २२ वर्ष व दिपक कल्याण पवार वय २० वर्ष दोघे रा. कोरेगाव ता. केज यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला असल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान या रस्त्याने प्रवास करीत असलेले स्व लोकनेते गोपीनाथ मुंडे सहकारी सुतगिरणीचे चेअरमन प्रा. डॉ विजयकुमार ठोंबरे, भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, कोरेगावचे राष्ट्रवादीचे सरपंच बालासाहेब तांदळे आणि पत्रकार गौतम बचुटे यांनी रस्त्यात थांबून पोलीस आणि दवाखाना रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. जखमींना रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांच्या मदतीने एका खाजगी वाहनाने जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात हलविले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना केज येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु अंबाजोगाई येथे दीपक पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून भागवत पवार यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू असून त्यांचेही प्रकृती चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here