Home Top News मातोश्रीच्या हाकेला मा.आ.सुनिल धांडे धावून गेले!

मातोश्रीच्या हाकेला मा.आ.सुनिल धांडे धावून गेले!

0
71

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी आ.सुनिल धांडे यांनी बांधले शिवबंध

जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना सोबत घेवून काम करणार-माजी – आ.सुनिल धांडे

प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत करणारे व जिल्ह्यात भगवं वातावरण निर्माण करणारे माजी आमदार सुनिल धांडे यांनी परत आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना सोबत घेवून प्रलंबित प्रश्‍नावर पूर्वीसारखं आक्रमकपणे काम करण्याचं मत प्रारंभशी बोलताना माजी आ.सुनिल धांडे यांनी व्यक्त केले.
पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दिर्घ आयुष्यासाठी बीड ते तुळजापूर पायी दिंडी काढणारे मातोश्रीचे लाडके आमदार सुनिल धांडे यांनी मातोश्रीवर आलेल्या संकटाच्या अनुषंगाने परत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आ.सुनिल धांडे यांना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले होते. यानंतर त्यांच्या हाकेला मान देत आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. एकेकाळी जिल्ह्यात भगवं वातावरण तयार करणारे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाप्रमुख सुनिल धांडे येणाऱ्या काळामध्ये सध्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यात परत शिवसेना सक्षम करण्यात यशस्वी होतील का हे पाहणं गरजेचं ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here