गेवराई प्रतिनिधी : गेवराई विधानसभा मतदारसंघांतील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाचेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली असून विजयी झालेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बीड येथील शिवछत्र कार्यालयात नवनिर्वाचित सदस्य सोमनाथ बनसोडे, बाबू सय्यद, नारायण हाटवटे, बाळु प्रधान, रामेश्वर आडे, तुकाराम प्रधान, महादेव काळे आदींचा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ईमु पटेल, याहीया पटेल, शिवाजी खरसाडे, विनायक खरसाडे, श्रीकृष्ण वेताळ, बाळु पिंगळे, अशोक काळे, दत्ता शेळके, बाळु आडे, अक्षय मिटकरी, हरी प्रधान, खंडू शेळके, रावसाहेब बनसोडे यांच्यासह पाचेगाव, पवारवाडी तांडा, रेखा तांडा आदी ठिकाणचे ग्रामस्थ उपस्थित होते.




















