Home Top News बीड जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट; तीन दुचाकी चोरीस

बीड जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट; तीन दुचाकी चोरीस

0
75

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून मंगळवारी (ता. 19) जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या. अंबाजोगाई शहर, परळी ग्रामीण व माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

सुरज ज्योतीराम सुर्यवंशी यांची दुचाकी (क्रमांक एमएच 44 एक्स 7202) अंबाजोगाई शहर येथून अज्ञात चोरट्यांनी लांबवली. तसेच ऋषीकेश दगडूबा सोळंके यांची दुचाकी (क्रमांक एमएच 44 एल 4630) परळी ग्रामीण हद्दीतून चोरीस गेली. यासह लिंबाजी मारोती सोनपसारे यांची दुचाकी (क्रमांक एमएच 23 इ 8811) माजलगाव शहरातून चोरीस गेली. असा एकूण तीन दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना मंगळवारी जिल्ह्यात घडल्या. जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने करावा, अशी मागणी नागरीक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here