Home Top News क्षीरसागर बंधूंना जनता हद्दपार करणार- राजेंद्र मस्के ,सलीम जहांगीर, सर्जेराव तांदळे

क्षीरसागर बंधूंना जनता हद्दपार करणार- राजेंद्र मस्के ,सलीम जहांगीर, सर्जेराव तांदळे

0
74
बीड प्रतिनिधी : गेली 35 वर्षापासून क्षीरसागर बंधूंच्या ताब्यात एक हाती नगर परिषदेत सत्ता आहे. परंतु दुर्दैवाने बीड शहराचा सर्वांगीण विकास झाला नाही. शहराच्या विकासाचे तीन तेरा वाजवण्याचे काम क्षीरसागरांनी केले. जनतेचा भ्रमनिरास केला. भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पालकमंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने बीड नगरपरिषदेला जवळपास 550 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. क्षीरसागरांच्या टक्केवारीच्या वादामध्ये
ठेकेदार पळून गेला. अमृत अटल योजना आणि भुयारी गटार योजना अपयशी ठरली. भुयारी गटार योजना अमलात आली असती तर आज बीड शहरात रस्त्यावर पाणी साचले नसते. आणि चे साम्राज्य जनतेच्या नशिबी आले नसते. वरवर कौटुंबिक वाद दिसत असला तरी विकास निधी हडपण्यासाठी दोनही क्षीरसागर पुढे असतात. विकासाचे राजकारण न करता नगरपरिषद प्रशासनाचा गैरवापर केला. बगलबचांच्या वार्डा मध्येच कामे केली जातात.  डास निर्मूलनाची ची फवारणी सुद्धा ठरावीक वार्डातच केली जाते. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे कायम डोळेझाक केल्यामुळे संपूर्ण बीडकरांना समस्यांनी घेरले . भ्रष्ट आणि ढिसाळ कारभार करणाऱ्या दोनही क्षीरसागर बंधूंना जनताच तडीपार करणार आहे. जनतेच्या परिवर्तन लढ्यात भारतीय जनता पार्टी अग्रेसर आहे. सजगपणे बीडकरांनी हा लढा यशस्वी करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, सलीम जहांगीर यांनी केले आहे.

बीड शहरातील जनता
मूलभूत समस्यांनी अक्षरशः त्रस्त.सर्वत्र घाणीचे साम्राज्य. नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद गलथान कारभाराच्या विरोधात आज मोंढा भागात
भारतीय जनता पार्टीच्या वतीने
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,सर्जेराव तांदळे,सलीम जहांगीर, नवनाथ शिराळे, भगीरथ बियाणी , जगदीश गुरुखुदे, विक्रांत हजारी, चंद्रकांत फड,अजय सवाई, डॉ.लक्ष्मणजाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मोंढा विभागात निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रा.सचीन उबाळे,कपिल सौदा, नागेश पवार, विलास बामणे, अनिल चांदणे, भुषण पवार,बालाजी
पवार, संगीता धसे, शैलजा मुसळे, छाया मिसाळ, लता मस्के, संध्या राजपूत, शितल राजपूत, मीरा गांधले, प्रीतकुकडेजा,मुसाखान,नूर लाला, प्रथमेश भालेराव,सचिन तिपटे, विशाल खाडे, सुभाष चव्हाण,भारत वाघमारे,
अमु जहागीरदार, शेख नजीर, विठ्ठल जाधव, लिंबा जाधव, कृष्णा जाधव, गणेश जाधव, सिद्धार्थ गायकवाड, ओंकार गायकवाड, रोहन जाधव, विशाल जाधव, आदित्य गायकवाड, ज्ञानेश्वर हिंगमिरे,मनोज पाबळे, सय्यद शेरअली, पंकज जाधव, सिकंदर पठाण, संदिपान गायकवाड, संतोष चांदणे, शुभम प्रभाळे, गोरख क्षीरसागर,आकाश [spacing size=””]घोरपडे, ऋषिकेश फुंदे,
अनिल वीर,यश कसबे, अमर सानप,अमू भाई, भैय्या खाडे,बाळासाहेब घुमरे,राजू वाघमारे, कांता जाधव,आदीसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here