Home Top News मतदार यादीत नाव शोधणे झाले सोपे: हे अॅप आजच लोड करा “ट्रू...

मतदार यादीत नाव शोधणे झाले सोपे: हे अॅप आजच लोड करा “ट्रू व्होटर ॲप”

0
68

या अॅपच्या मदतीने मोबाईलवर मतदारांचे नाव शोधता येणार

 बीड : नगरपरिषद/नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सदर मतदार यादीत आपले नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे यासाठी या मतदार याद्या ट्रू व्होटर (TRUE VOTER)  मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या वेळी प्रभागनिहाय मतदार यादीत आपले नाव शोधताना मतदारांची धावपळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदार यादीत नाव शोधणे सोपे झाल्यास मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होईल. वरील पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी काळात सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात TRUE VOTER मोबाईल ॲपव्दारे प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्ये आपले नाव शोधण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ॲप प्ले स्टोर वरुन आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करता येते व त्याचा वापर सुलभरित्या करता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here