Home Top News Beed : ट्रक – क्रुझरचा भीषण अपघात; सात जण ठार

Beed : ट्रक – क्रुझरचा भीषण अपघात; सात जण ठार

0
68

दहा जण जखमी असून यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक
बर्दापुर ते अंबासागर परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : ट्रक-क्रुझर या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता. 23) सकाळी लातूर – अंबाजोगाई महामार्गावर नंदगोपाल डेअरी नजीक घडली. यात दहा जण जखमी झाले असून यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  येथील रस्ता अरुंद  असल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून या परिसरात अपघतांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन येथील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची गरज आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे मावंद्याचा कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून येत होते. आज सकाळी ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जण ठार झाले तर 10 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी ( वय 38), स्वाती बोडके (वय 35), शकुंतला सोमवंशी (वय 38), सोजरबाई कदम (वय 37), चित्रा शिंदे (वय 35), खंडू रोहिले (वय 35, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (वय 50), सोनाली सोमवंशी (वय 25), रंजना माने (वय 35), परिमला सोमवंशी (वय 70), दत्तात्रय पवार (वय 40), शिवाजी पवार (वय 45), यश बोडके (वय 9), श्रुतिका पवार (वय 6), गुलाबराव सोमवंशी (वय 50) आणि कमल जाधव (वय 30) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे. लातूरहून आलेला चौपदरी महामार्ग बर्दापूरच्या पुढे दुपदरी होऊन अरूंद होतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असेलल्या बर्दापूर ते अंबासाखर दरम्यान सतत अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. यामुळे लवकरात लवकर येथील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here