Home Top News पोलीस अधिक्षक यांना तात्काळ रजेवर पाठवणार – गृहमंत्री

पोलीस अधिक्षक यांना तात्काळ रजेवर पाठवणार – गृहमंत्री

0
67

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतचा प्रश्‍न आज (ता. 07) अधिवेशनात चांगला गाजला असून तात्काळ पोलीस अधिक्षक यांना रजेवर पाठवणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशनात दिली. यासह 15 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करणार येईल असे  सुद्धा गृहमंत्री म्हणाले.

बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण न राहील्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. यासर्व विषयांवर बीड जिल्ह्यातील तीन आमदारांनी लक्षवेध मांडली. यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, पोलीस अधिक्षक यांना रजेवर तात्काळ रजेवार पाठवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here