Home Top News तीन बालकांचा मुत्यू; बागझरी येथील दुर्दैवी घटना

तीन बालकांचा मुत्यू; बागझरी येथील दुर्दैवी घटना

0
76

रात्रीच्या जेवनातुन झाली विषबाधा; आईची प्रकृती चिंताजनक

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील एकाच कुटूंबातील तीन संख्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. बालकांच्या आईची प्रकृती चिंतानजक असून रात्रीच्या जेवनातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी काशीनाथ दत्तु धारासुरे यांच्या कुटूंबात दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. रात्रीच्या जेवनातुन झालेल्या विषबाधेत काशीनाथ यांच्या दोन मुली साधना (वय सहा) व श्रावणी (वय चार) यांच्यासह मुलगा नारायण (वय आठ) यांचा यात मृत्यू झाला. तसेच काशीनाथ यांच्या पत्नी भाग्यश्री (वय 28) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एकाच कुटूंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here